व्यावसायिक अभ्यासक्रम

महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करू न शकलेल्या तसेच विशेष शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अल्प मुदतीचे व्यावसायिक अभ्यासक्रम राबविले जातात. राज्यभरातील एकूण १०८४ संस्थांमध्ये या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून इच्छुकांना प्रशिक्षण दिले जाते.
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळातर्फे तंत्रनिकेतन संस्थांमधील शिक्षक प्रशिक्षक वर्गासाठी आधुनिक आणि अद्ययावत प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातात. त्यात मजकूर अद्यतन प्रशिक्षण, कौशल्य विकास, औद्योगिक प्रशिक्षण अशा विविध क्षेत्रांशी संबंधित प्रशिक्षणाचा समावेश आहे. आपल्या परिसरात या मंडळातर्फे राबविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांबाबत जाणून घ्या.
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ
व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयातर्फे महाराष्ट्र राज्यातील उद्योगांच्या तसेच सेवा क्षेत्रातील व्यवसायांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विविध शैक्षणिक संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि विविध स्वयंसेवी संस्थाना प्रशासन तसेच व्यवसायसंबंधी शिक्षण आणि प्रशिक्षण प्रदान केले जाते. संचालनालयातर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमांबद्दल अधिक जाणून घ्या.
असंघटित आणि अनौपचारिक क्षेत्रातील कारागिरांचे कौशल्य विकसित करण्यासाठीही संचालनालयातर्फे उपयुक्त उपक्रम राबविले जातात. या कारागिरांना आपल्या कौशल्याशी संबंधित सर्वोत्तम प्रशिक्षण घेता यावे, यासाठी अनेक व्यावसायिक पदविका आणि पदवी अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत. आर्टिझन टू टेक्नोक्रॅट या उपक्रमाबद्दल अधिक जाणून घ्या.
जिल्हे
शहरे
निर्देशिका
शासकीय विभाग
महामंडळे
महाराष्ट्रातील वास्तव्य
आरोग्य सेवा
ज्येष्ठ नागरिक
युवा आणि महिला सक्षमीकरण
रोजगार संधी
परिचय
शाळा
महाविद्यालये आणि विद्यापीठे
व्यावसायिक अभ्यासक्रम
सेवा 
मूलभूत घटक
योजना
नाविन्याची कास
पुरक उद्योग
उद्योगाची पायाभरणी
भरभराट
समापन
समुद्रकिनारे
सरोवराकाठी
थंड हवेची ठिकाणे
वारसा स्थळे