या भागात आपण जमीन, माती, बियाणे, खते आणि शेतीशी संबंधित इतर आवश्यक घटकांबद्दलचे तपशील आणि विविध योजनांबाबत जाणून घेऊ.
जमीन
जमिनीच्या नोंदी अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. तुम्ही शेतकरी असाल किंवा तुम्ही शेती करू इच्छित असाल तर राज्यात शेतीसंदर्भात वापरात असणाऱ्या काही संज्ञांची माहिती असणे गरजेचे आहे.
७/१२ - सातबारा उताऱ्यामध्ये अर्ज क्र. ७ आणि अर्ज क्र. १२ अशा दोन अर्जांचे उतारे असतात. त्यावर सर्वेक्षण क्रमांक, जमीन मालक आणि लागवड करणाऱ्याचे नाव, जमिनीचे क्षेत्र आणि लागवडीचा प्रकार याबाबतची माहिती असते. त्याचबरोबर जमीन मालकाला शासकीय संस्थांद्वारे देण्यात आलेल्या कर्जाची नोंदसुद्धा या सात बारा उताऱ्यावर असते.
8 अ - 8 अ अर्जामध्ये खातेदाराच्या जमिनीचे क्षेत्रफळ आणि त्याला देय असलेला कर, अशा तपशीलांची नोंद केलेली असते.
फेरफार - फेरफार हा एक कायदेशीर दस्तावेज असून त्यात जमिनीच्या सर्व व्यवहारांच्या नोंदी असतात.
तुम्ही शेतजमिनीशी संबंधित विविध नोंदी पाहू शकता आणि संबंधित दस्तावेज डाउनलोड करू शकता.
मातीची गुणवत्ता जाणून घेणे शेतीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. त्यासाठी मृदा आरोग्य कार्ड योजनेबद्दल अधिक जाणून घ्या. ही सेवा तुमच्या शेतजमिनीच्या मातीच्या गुणवत्तेला अनुरूप सल्ला देते आणि आवश्यक असलेल्या विविध पोषक घटकांच्या प्रमाणाबाबतही शिफारशी करते. खते आणि त्यांचे योग्य प्रमाण याबाबतही या सेवेच्या माध्यमातून सल्ला दिला जातो.
राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यास सरकार वचनबद्ध आहे. राज्यातील शेतकऱ्यांना उत्तम बियाणे उपलब्ध करून देणारे, महाबीज या नावाने सुपरिचित असणारे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित हे भारतातील सर्वात मोठे आणि आघाडीचे बियाणे महामंडळ आहे. अकोला जिल्ह्यात असलेल्या या महामंडळात ५० पेक्षा जास्त पिकांच्या बियाण्यांचे उत्पादन घेतले जाते, त्यावर प्रक्रिया केली जाते तसेच विपणनही केले जाते. शेतकऱ्यांसाठी सर्व श्रेणींमधील २५० वाणे उपलब्ध आहेत. अधिक तपशीलांसाठी खाली क्लिक करा.
काही वेळा पीक उत्पादनासाठी आवश्यक तितका पाऊस पडत नाही. अशावेळी शेतकऱ्यांना विविध सिंचन पर्यायांचा वापर करावा लागतो. अशा सिंचनाचे विविध पर्याय राज्यात उपलब्ध आहेत. राज्यातील विविध सिंचन प्रकल्प आणि शेतकऱ्यांसाठी उपलब्ध सिंचन सेवांबाबत जाणून घ्या.
पिकावर पडणारे रोग, किडींचा प्रादुर्भाव आणि रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कीटकनाशके उपयुक्त ठरतात. शेतासाठी उपयुक्त कीटकनाशकांचे विविध प्रकार आहेत. अशा कीटकनाशकांच्या वापराबाबत कृषी विद्यालये किंवा राज्यातील कीटकनाशक उत्पादकांकडून सल्ला मिळू शकतो. कीटकनाशक फवारणीसाठी भारतात ड्रोनचा वापर वाढू लागला आहे. ड्रोनद्वारे फवारणी हा एक जलद आणि परवडण्याजोगा पर्याय आहे.
महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महा-राज्य कामगार विमा सोसायटी कार्यालय, मुंबई येथे व त्यांचे अंतर्गत सेवा दवाखाना, महात्मा गांधी स्मारक रुग्णालय, परेल, विलेपार्ले, चारकोप कांदिवली येथे वैद्यकीय अधिकारी, गट-अ...
+अधिक
कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठीची विभागीय परीक्षा-2022 ची...
+अधिक
सहायक कक्ष अधिकारी सेवाप्रवेशोत्तर परीक्षा-2022 च्या...
+अधिक
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची ५ वाहने विक्री...
+अधिक
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील कालबाह्य उपकरणांची विक्री करणेबाबतची...
+अधिक
राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय, मुंबई यांच्यासाठी 1 लेझर मल्टी फंक्शन ऑटो डूप्लेस्क कलर प्रिंटर खरेदी करण्याकरीता दरपत्रक...
+अधिक
सनदी लेखापाल/कर सल्लागार यांची नेमणूक करणेबाबत दरपत्रके...
+अधिक
किरकोळ साधन सामुग्री, लेखनसामुग्री व उपयोग भांडार वस्तू खरेदीसाठी पुरवठादाराची नियुक्ती...
+अधिक
विधि व न्याय विभागातील निर्लेखित वाहन क्र. एम एच ०१ ए एन ७९७९ होंडा सिटी ची लिलावाने विक्री करण्याबाबत...
+अधिक
अन्न व औषध प्रशासनातील अन्न सुरक्षा अधिकारी ( गट-ब ) ( राजपत्रित ) हे पद राज्य शासनाच्या सेवेतील अधिका-यांमधुन प्रतिनियुक्तीने भरण्याबाबतचा...
+अधिक
आधार, ग्राहक तक्रार निवारण, निवृत्ती वेतन, शालार्थ आणि बिंदुनामावलीसाठी नागरिक सुविधा केंद्राचा संपर्क क्रमांक 18001208040
हा दुवा बाह्य संकेतस्थळावर नेणारा आहे. त्या बाह्य संकेतस्थळावरील माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाचे हे पोर्टल जबाबदार नाही, हे कृपया लक्षात असू द्या.