महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री

हे पेज शेअर करा:
Deputy Chief Minister of Maharashtra

अजित पवार
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते श्री. अजित अनंत पवार हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. सामाजिक प्रश्नांची उत्तम जाण असणारे अजित पवार यांचा जनसंपर्क दांडगा आहे. संघटन कौशल्य आणि धडाडीचे निर्णय हे त्यांचे गुणविशेष सुपरिचित आहेत.

१९९१ साली ते बारामतीमधून लोकसभेवर निवडून गेले. लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर १९९१, १९९५, १९९९, २००४, २००९, २०१४ आणि २०१९ असे सलग सात वेळा ते महाराष्ट्र राज्य विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले. १९९९ ते २०२३ अशा २४ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत त्यांनी आतापर्यंत चार वेळा उपमुख्यमंत्री पद भूषविले असून वित्त, नियोजन, उर्जा, पाटबंधारे, फलोत्पादन ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता अशा विविध खात्यांचे मंत्री आणि राज्यमंत्री म्हणून कामकाज पाहिले आहे.

२० जुलै २००६ ते २३ जुलै २०१८ असा प्रदीर्घ काळ ते महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. मार्च २००९ ते २०१४ या अवधीत आणि त्यानंतर नोव्हेंबर २०१८ पासून आजतागायत ते महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. सप्टेंबर २००६ पासून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष म्हणून तस मार्च २०१३ पासून महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत.

वक्तशीरपणा, जनतेसाठी सतत उपलब्ध असणे, त्यांचे प्रश्न मार्गी लावणे, विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी अभ्यासपूर्ण चर्चा करून निर्णय घेणे आणि विकास साधताना कलात्मक दृष्टी जोपासणे या गुणविशेषांमुळे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांनी जनतेच्या मनात आदराचे स्थान प्राप्त केले आहे.

ताज्या घडामोडी :

  • xcv... +अधिक
  • ई-निविदा सूचना (वर्ष... +अधिक
  • महाजिओटेक महामंडळ  (MahaGeo Tech Corporation) च्या तांत्रिक व कार्यालयीन कामकाजाकरिता 1 सेवानिवृत्त कक्ष अधिकारी  व 1 सेवानिवृत्त सहायक कक्ष अधिकारी यांची करार पध्दतीने नियुक्ती... +अधिक
  • महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महा-राज्य कामगार विमा सोसायटी कार्यालय, मुंबई येथे व त्यांचे अंतर्गत सेवा दवाखाना, महात्मा गांधी स्मारक रुग्णालय, परेल, विलेपार्ले, चारकोप कांदिवली येथे वैद्यकीय अधिकारी, गट-अ... +अधिक
  • कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठीची विभागीय परीक्षा-2022 ची... +अधिक
  • सहायक कक्ष अधिकारी सेवाप्रवेशोत्तर परीक्षा-2022 च्या... +अधिक
  • महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची ५ वाहने विक्री... +अधिक
  • महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील कालबाह्य उपकरणांची विक्री करणेबाबतची... +अधिक
  • राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय, मुंबई यांच्यासाठी 1 लेझर मल्टी फंक्शन ऑटो डूप्लेस्क कलर प्रिंटर खरेदी करण्याकरीता दरपत्रक... +अधिक
  • सनदी लेखापाल/कर सल्लागार यांची नेमणूक करणेबाबत दरपत्रके... +अधिक
  • वाहनाच्या सुट्टे भागांच्या खरेदीबाबत चे... +अधिक
  • किरकोळ साधन सामुग्री, लेखनसामुग्री व उपयोग भांडार वस्तू खरेदीसाठी पुरवठादाराची नियुक्ती... +अधिक
  • विधि व न्याय विभागातील निर्लेखित वाहन क्र. एम एच ०१ ए एन ७९७९ होंडा सिटी ची लिलावाने विक्री करण्याबाबत... +अधिक
  • अन्न व औषध प्रशासनातील अन्न सुरक्षा अधिकारी ( गट-ब ) ( राजपत्रित ) हे पद राज्य शासनाच्या सेवेतील अधिका-यांमधुन प्रतिनियुक्तीने भरण्याबाबतचा... +अधिक

आधार, ग्राहक तक्रार निवारण, निवृत्ती वेतन, शालार्थ आणि बिंदुनामावलीसाठी नागरिक सुविधा केंद्राचा संपर्क क्रमांक 18001208040https://maharashtra.mygov.in/