शेतकरी वर्गासाठी राज्य शासनातर्फे अनेक योजना उपलब्ध आहेत. माती, बियाणे, सिंचन, यंत्रे, तंत्रज्ञान, पत, विमा, पिकाला संरक्षण आणि विपणन हे शेतीशी संबंधित महत्वपूर्ण घटक आहेत. तुम्हाला याबाबत सहाय्य हवे असल्यास राज्य सरकारने देऊ केलेल्या विविध योजनांबाबत जाणून घ्या.
नॅशनल अॅग्रिकल्चर मार्केट किंवा ई-नाम हा भारतातील कृषी उत्पादनासाठीचा ऑनलाइन खरेदी – विक्री मंच आहे. हा मंच शेतकरी, व्यापारी आणि खरेदीदारांना उत्पादनाचे ऑनलाइन व्यवहार करण्याची सुविधा प्रदान करतो. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला दर मिळवून देण्याबरोबरच उत्पादनांच्या फायदेशीर विपणनासाठी सुद्धा हा मंच उपयुक्त ठरतो आहे.
शेतकऱ्यांव्यतिरिक्त, कृषी उत्पन्न बाजार समिती, व्यापारी, शेतकरी उत्पादक संस्था आणि मंडया या मंचाचे भाग आहेत. नोंदणीसाठीची मार्गदर्शक तत्त्वे वाचून घ्या आणि या मंचावर नाव नोंदणी करा. या मंचावर व्यवहार करण्यात आलेल्या उत्पादनांची यादीही तुम्हाला पाहता येईल.
पीएम-किसान योजना या नावाने ही योजना प्रसिद्ध आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनीचा आकार विचारात न घेता, स्वत:च्या नावावर लागवडीयोग्य जमीन असलेल्या सर्व शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ६००० रूपये इतकी रक्कम प्रदान केली जाते. हा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो.
मदतीसाठी हेल्प डेस्कशी संपर्क साधता येईल आणि या योजनेच्या तपशीलांबद्दलही अधिक जाणून घेता येईल.
कृषी तारण कर्ज योजना
या योजनेमध्ये शेतकरी म्हणून तुम्ही तुमचे उत्पादन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामात ठेवू शकता आणि त्या उत्पादनाच्या किंमतीच्या ७५% रक्कम कर्ज म्हणून मिळवू शकता. बाजारात उत्पादनांचे दर वधारले की तुम्ही तुमचे उत्पादन बाजारात विकू शकता आणि कर्जाची परतफेड करू शकता. तुमच्या उत्पादनाला जास्त चांगला दर मिळण्याच्या दृष्टीने ही योजना एक वरदानच आहे.
सागरी मार्गाने कृषी उत्पादनाच्या निर्यातीसाठी अनुदान योजना
या योजनेत, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक गट/कंपनी, संस्था, निर्यातदार किंवा शेतकरी या पैकी जे कोणी निर्दिष्ट कृषी उत्पादनाची निर्यात करेल, ते रू. ५०,०००/- प्रति कंटेनर ( २० फूट/४० फूट) इतक्या अनुदानास पात्र असतील. प्रति लाभार्थी कमाल वार्षिक अनुदान १ लाख रुपये इतके असेल.
या योजनेंतर्गत आंबा, संत्री, मोसंबी, द्राक्षे अशी हंगामी फळे तसेच उत्पादकांकडून थेट ग्राहकांपर्यंत धान्य विक्रीसाठी उत्सव आयोजित केले जातात. महोत्सवाचा कालावधी किमान पाच दिवसांचा असावा अशी पूर्व अट असून महोत्सवासाठी प्रति स्टॉल रु.2000/- इतके आर्थिक सहाय्य देय असेल.
महाराष्ट्रातून इतर राज्यांमध्ये रस्ते वाहतुकीद्वारे शेतमालाच्या थेट विक्रीच्या व्यवहारासाठी ही योजना उपयुक्त आहे. राज्यातील नोंदणीकृत शेतकरी, उत्पादक कंपन्या आणि कृषी उत्पादक सहकारी संस्था या योजनेंतर्गत अनुदानास पात्र आहेत.
महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महा-राज्य कामगार विमा सोसायटी कार्यालय, मुंबई येथे व त्यांचे अंतर्गत सेवा दवाखाना, महात्मा गांधी स्मारक रुग्णालय, परेल, विलेपार्ले, चारकोप कांदिवली येथे वैद्यकीय अधिकारी, गट-अ...
+अधिक
कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठीची विभागीय परीक्षा-2022 ची...
+अधिक
सहायक कक्ष अधिकारी सेवाप्रवेशोत्तर परीक्षा-2022 च्या...
+अधिक
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची ५ वाहने विक्री...
+अधिक
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील कालबाह्य उपकरणांची विक्री करणेबाबतची...
+अधिक
राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय, मुंबई यांच्यासाठी 1 लेझर मल्टी फंक्शन ऑटो डूप्लेस्क कलर प्रिंटर खरेदी करण्याकरीता दरपत्रक...
+अधिक
सनदी लेखापाल/कर सल्लागार यांची नेमणूक करणेबाबत दरपत्रके...
+अधिक
किरकोळ साधन सामुग्री, लेखनसामुग्री व उपयोग भांडार वस्तू खरेदीसाठी पुरवठादाराची नियुक्ती...
+अधिक
विधि व न्याय विभागातील निर्लेखित वाहन क्र. एम एच ०१ ए एन ७९७९ होंडा सिटी ची लिलावाने विक्री करण्याबाबत...
+अधिक
अन्न व औषध प्रशासनातील अन्न सुरक्षा अधिकारी ( गट-ब ) ( राजपत्रित ) हे पद राज्य शासनाच्या सेवेतील अधिका-यांमधुन प्रतिनियुक्तीने भरण्याबाबतचा...
+अधिक
आधार, ग्राहक तक्रार निवारण, निवृत्ती वेतन, शालार्थ आणि बिंदुनामावलीसाठी नागरिक सुविधा केंद्राचा संपर्क क्रमांक 18001208040
हा दुवा बाह्य संकेतस्थळावर नेणारा आहे. त्या बाह्य संकेतस्थळावरील माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाचे हे पोर्टल जबाबदार नाही, हे कृपया लक्षात असू द्या.