महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य आहे आणि राज्यात शेतकऱ्यांसाठी अनेक अभिनव उपक्रम उपलब्ध आहेत. या भागात अशाच काही अॅप्सची माहिती दिली आहे. त्यांचा वापर करणे सोपे आहेत आणि ती अतिशय उपयुक्त आहेत.
अॅप्स
कृषिक
कृषिक हे मोबाईल अॅप्लिकेशन आहे. हे अॅप तुमच्या मोबाईल फोनवर डाऊनलोड करा आणि नोंदणी करा. या अॅपवर नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज, बाजारभाव, कृषीसंबंधी सल्ला आणि उपयुक्त बातम्या मराठी भाषेत प्राप्त होतात.
हे मोबाइल अॅप आजच्या दिवसाबरोबरच पुढील 5 दिवसांचे हवामान, बाजारभाव, कृषी सल्ला, वनस्पती संरक्षण अशा शेतीसंबंधी विविध उपयुक्त बाबींची माहिती देते. प्रतिकूल हवामानाच्या सूचना, जवळच्या बाजारपेठांमधील वस्तूंचे बाजारभाव तसेच उत्पादनाला राज्यात मिळणारा कमाल दर असे उपयुक्त तपशील या मोबाइल अॅपवर उपलब्ध आहेत.
या अॅपद्वारे भारतीय कृषी संशोधन परिषदेतर्फे विकसित पिकांच्या नवीन वाणांबाबतची माहिती, स्रोत संवर्धन पद्धती तसेच शेतीसाठी उपयुक्त यंत्रे अशा विविध उपयुक्त घटकांशी संबंधित माहिती शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे.
एम किसान पोर्टलवर नोंदणी न करता सुद्धा या सेवेमार्फत शेतकरी आणि इतर सर्व भागधारकांना कृषीसंबंधी तज्ञ आणि शासकीय अधिकाऱ्यांचा सल्ला आणि माहिती प्राप्त होऊ शकते.
शेतकरी हे 1965 सालापासून प्रकाशित होत असणारे कृषी क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय मासिक आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे हे मासिक प्रकाशित होते. शेतकरी मासिकासाठीचा अँड्रॉइड अॅपचा इंटरफेस अतिशय सोपा आहे. या अंकांची नोंदणी करण्यासाठी आणि अंक डाउनलोड करण्यासाठी मोबाइल इंटरनेट किंवा वाय-फाय कनेक्टिव्हिटी आवश्यक आहे.
गारपिटीमुळे झालेल्या पिकांचे नुकसान जाणून घेण्यासाठी हे अॅप विकसित करण्यात आले आहे. कृषी अधिकारी हे मोबाईल अॅप लोड केलेले मोबाईल किंवा टॅबलेट घेऊन शेतात जातात. या अॅपचा वापर करून अक्षांश आणि रेखांश, पिकाचे नाव, पेरणीची तारीख, संभाव्य कापणीची तारीख आणि सिंचनाचे स्रोत असलेले शेताचे छायाचित्र काढता येते. प्राप्त केलेली माहिती आपोआप भुवन पोर्टलवर पाठवली जाते आणि या माहितीचे विश्लेषणही सहज करता येते.
या अॅपचा वापर करून मोबाईल असलेल्या ठिकाणापासून ५० किमी परिघाच्या आत असलेल्या बाजारपेठेतील पिकांचे बाजारभाव मिळवता येतात. त्यासाठी हे अॅप मोबाईलमधल्या जीपीएसचा वापर करते. जर तुम्ही जीपीएस लोकेशनचा वापर करू इच्छित नसलात तर दुसऱ्या पर्यायाचा वापर करून कोणत्याही बाजारपेठेतील कोणत्याही पिकाचे बाजारभाव प्राप्त करू शकता.
कृषी मंत्रालयाच्या फसल प्रकल्पांतर्गत पीक मूल्यांकनासाठी क्षेत्रीय माहिती संकलन करण्याच्या दृष्टीने हे अॅप उपयुक्त आहे. या अॅपचा वापर करून शेतकरी पिकांची स्थिती, वाण आणि मातीची स्थिती दर्शविणारी चित्रे आपल्या मोबाइलमधून अपलोड करू शकतात.
या अॅपद्वारे शेतकऱ्यांना पिकाच्या विविध हंगामांचे तपशील, विशिष्ट महिन्यातील वातावरण आणि विविध पिके घेण्यासाठी उपयुक्त आदर्श हवामानाबाबत माहिती मिळू शकते.
डीडी किसान ही भारतातील शेतकरी आणि ग्रामीण समुदायाला सेवा देणारी एक समर्पित दूरचित्रवाणी वाहिनी आहे. या वाहिनीवरील नाविन्यपूर्ण कार्यक्रम देशाच्या दुर्गम भागातील जनतेपर्यंत पोहोचतात आणि कृषीसंबंधी माहिती देण्याच्या तसेच कृषी क्षेत्राच्या शाश्वत आणि सर्वसमावेशक वाढीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरतात.
महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाचा हा उपक्रम आहे. या YouTube वाहिनीवर तुम्ही शेतीशी संबंधित अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहू शकता. मान्यवर तज्ञांचा सहभाग असणाऱ्या मुलाखती आणि माहितीपूर्ण सत्रे, ही या उपक्रमाची ठळक वैशिष्ट्ये आहेत.
महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महा-राज्य कामगार विमा सोसायटी कार्यालय, मुंबई येथे व त्यांचे अंतर्गत सेवा दवाखाना, महात्मा गांधी स्मारक रुग्णालय, परेल, विलेपार्ले, चारकोप कांदिवली येथे वैद्यकीय अधिकारी, गट-अ...
+अधिक
कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठीची विभागीय परीक्षा-2022 ची...
+अधिक
सहायक कक्ष अधिकारी सेवाप्रवेशोत्तर परीक्षा-2022 च्या...
+अधिक
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची ५ वाहने विक्री...
+अधिक
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील कालबाह्य उपकरणांची विक्री करणेबाबतची...
+अधिक
राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय, मुंबई यांच्यासाठी 1 लेझर मल्टी फंक्शन ऑटो डूप्लेस्क कलर प्रिंटर खरेदी करण्याकरीता दरपत्रक...
+अधिक
सनदी लेखापाल/कर सल्लागार यांची नेमणूक करणेबाबत दरपत्रके...
+अधिक
किरकोळ साधन सामुग्री, लेखनसामुग्री व उपयोग भांडार वस्तू खरेदीसाठी पुरवठादाराची नियुक्ती...
+अधिक
विधि व न्याय विभागातील निर्लेखित वाहन क्र. एम एच ०१ ए एन ७९७९ होंडा सिटी ची लिलावाने विक्री करण्याबाबत...
+अधिक
अन्न व औषध प्रशासनातील अन्न सुरक्षा अधिकारी ( गट-ब ) ( राजपत्रित ) हे पद राज्य शासनाच्या सेवेतील अधिका-यांमधुन प्रतिनियुक्तीने भरण्याबाबतचा...
+अधिक
आधार, ग्राहक तक्रार निवारण, निवृत्ती वेतन, शालार्थ आणि बिंदुनामावलीसाठी नागरिक सुविधा केंद्राचा संपर्क क्रमांक 18001208040
हा दुवा बाह्य संकेतस्थळावर नेणारा आहे. त्या बाह्य संकेतस्थळावरील माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाचे हे पोर्टल जबाबदार नाही, हे कृपया लक्षात असू द्या.