शेती आणि पुरक उद्योग हे राज्याच्या अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी साधारण निम्मी लोकसंख्या उदरनिर्वाहासाठी या क्षेत्रावर अवलंबून आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेत कृषी आणि पुरक उद्योग क्षेत्राचा सरासरी वाटा सुमारे १२ टक्के इतका आहे.
कृषी क्षेत्रातील विविध सुधारणांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र राज्याने अव्वल क्रमांक प्राप्त केला आहे. नीती आयोगाने याबाबतची राज्यांची क्रमवारी प्रसिद्ध केली असून कृषी विपणन, जमीन भाडेपट्ट्याने देणे आणि खाजगी जमिनीवर वनीकरण अशा निकषांवर महाराष्ट्र राज्य अव्वल ठरले आहे. कृषीसंबंधी सुधारणांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे आणि शेती करण्यासाठी राज्यात पोषक वातावरण उपलब्ध आहे.
मागच्या सहा दशकांमध्ये राज्याने पीक उत्पादनात भरीव प्रगतीची नोंद केली आहे. २०१९-२० मध्ये सुमारे १९ लाख हेक्टर क्षेत्र इतकी व्याप्ती असणारे फलोत्पादन क्षेत्र २०२०-२१ मध्ये सुमारे २१ लाख हेक्टरपर्यंत वाढले; या क्षेत्रात ११.४ टक्के इतकी लक्षणीय वाढ झाली तर सेंद्रिय शेती उत्पादनात महाराष्ट्र २२ टक्के भागिदारीसह देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना अल्पमुदतीचे कर्ज तसेच विविध बँका आणि सहकारी संस्थांमार्फत आर्थिक सहाय्य दिले जाते. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकांनी २०२१-२२ या वर्षात राज्यात ३१.८२ लाख किसान क्रेडिट कार्ड प्रदान केली. २०२०-२१ मध्ये या कार्ड धारकांना मंजूर केलेल्या कर्जाची रक्कम १७,६४९ कोटी रूपये इतकी आहे. (स्रोत – महाराष्ट्राचे आर्थिक सर्वेक्षण 2021-22)
तुम्ही राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठीच्या उपयुक्त कृषी योजनांबद्दल अधिक जाणून घेऊ शकता. या तपशीलामध्ये शेतीसाठी उपयुक्त हवामान क्षेत्राचा प्रकार, भौगोलिक स्थान, पर्जन्यमानाचे स्वरूप, जमिनीचा वापर, मातीची वैशिष्ट्ये, सिंचनाचे स्रोत, जिल्ह्यातील प्रमुख पिके आणि इतर बाबी समाविष्ट आहेत.
कृषी विद्यापीठे
तुम्ही विद्यार्थी असाल आणि शेतीच्या पद्धती, नवनवीन शोध आणि तंत्रे शिकण्यात तुम्हाला स्वारस्य असले तर पुढील शिक्षणासाठी तुम्ही राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊ शकता. या विद्यापीठांचे अभ्यासक्रम, अभ्यासक्रमांचा कालावधी, प्रवेश प्रक्रिया आणि इतर नियमांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खाली क्लिक करा.
महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महा-राज्य कामगार विमा सोसायटी कार्यालय, मुंबई येथे व त्यांचे अंतर्गत सेवा दवाखाना, महात्मा गांधी स्मारक रुग्णालय, परेल, विलेपार्ले, चारकोप कांदिवली येथे वैद्यकीय अधिकारी, गट-अ...
+अधिक
कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठीची विभागीय परीक्षा-2022 ची...
+अधिक
सहायक कक्ष अधिकारी सेवाप्रवेशोत्तर परीक्षा-2022 च्या...
+अधिक
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची ५ वाहने विक्री...
+अधिक
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील कालबाह्य उपकरणांची विक्री करणेबाबतची...
+अधिक
राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय, मुंबई यांच्यासाठी 1 लेझर मल्टी फंक्शन ऑटो डूप्लेस्क कलर प्रिंटर खरेदी करण्याकरीता दरपत्रक...
+अधिक
सनदी लेखापाल/कर सल्लागार यांची नेमणूक करणेबाबत दरपत्रके...
+अधिक
किरकोळ साधन सामुग्री, लेखनसामुग्री व उपयोग भांडार वस्तू खरेदीसाठी पुरवठादाराची नियुक्ती...
+अधिक
विधि व न्याय विभागातील निर्लेखित वाहन क्र. एम एच ०१ ए एन ७९७९ होंडा सिटी ची लिलावाने विक्री करण्याबाबत...
+अधिक
अन्न व औषध प्रशासनातील अन्न सुरक्षा अधिकारी ( गट-ब ) ( राजपत्रित ) हे पद राज्य शासनाच्या सेवेतील अधिका-यांमधुन प्रतिनियुक्तीने भरण्याबाबतचा...
+अधिक
आधार, ग्राहक तक्रार निवारण, निवृत्ती वेतन, शालार्थ आणि बिंदुनामावलीसाठी नागरिक सुविधा केंद्राचा संपर्क क्रमांक 18001208040
हा दुवा बाह्य संकेतस्थळावर नेणारा आहे. त्या बाह्य संकेतस्थळावरील माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाचे हे पोर्टल जबाबदार नाही, हे कृपया लक्षात असू द्या.