उद्योगाची पायाभरणी
उद्योग जगतासाठी उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि अनुकूल वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे. राज्यात उद्योग सुरू करण्यासाठी मदतीचा हात देण्यास विविध सरकारी विभाग आणि संस्था तत्पर आहेत. स्वत:चा उद्योग कसा सुरू करायचा, त्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी, शुल्क, विविध अर्ज, त्यांचा मागोवा आणि उपलब्ध सेवा तसेच संधींबद्दल जाणून घ्या आणि त्यांचा लाभ घ्या..
भारत सरकारने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास कायदा, २००६ अधिसूचित केला आहे. यासंदर्भात २७ ऑक्टोबर २००६ रोजी जारी अधिसूचनेनुसार "उद्योग" शब्दाच्या जागी "एंटरप्राइजेस" असा शब्द वापरण्यात आला आहे. सेवा आणि उत्पादन अशा दोन्ही क्षेत्रातील प्रत्येकी तीन प्रकारच्या उपक्रमांचा उल्लेख करण्यात आला आहे. तुम्ही राज्यात एखादा उपक्रम किंवा लघु/मध्यम/मोठा किंवा मेगा प्रकल्प सुरू करू इच्छित असाल, तर तुम्हाला आकारमान आणि गुंतवणुक या बाबी विचारात घ्याव्या लागतील.
जमीन अर्ज प्रक्रिया, पर्यावरण मंजुरी आणि उद्योग उभारणी मंजूरी तसेच प्रकल्प सुरू होण्यापूर्वी आवश्यक मंजुरीबद्दल सविस्तर जाणून घ्या. विविध सेवा आणि योजना, ऑनलाइन अर्ज कसा करावा आणि एकंदर अर्ज प्रक्रिया, याबाबतच्या तपशीलांसाठी येथे क्लिक करा.
तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर, डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र, कंपनीचे नाव रजिस्ट्रार ऑफ कंपनीजकडे आरक्षित करणे आणि कायमस्वरूपी खाते क्रमांक प्राप्त करणे आवश्यक आहे. त्याविषयी तसेच इतर महत्वाच्या बाबींविषयी तपशीलवार जाणून घ्या.
तुम्हाला राज्यात एखादे नवीन दुकान किंवा व्यावसायिक आस्थापना सुरू करायची असेल तर त्यासाठी बॉम्बे शॉप्स अँड कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट, १९४८ अंतर्गत नोंदणी करावी लागेल. दुकाने आणि आस्थापनांच्या नवीन नोंदणीबाबतची सविस्तर प्रक्रिया जाणून घ्या.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ राज्यातील उद्योगांना जमीन, रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी सुविधा आणि पथदिवे अशा पायाभूत सुविधा पुरवते. गुंतवणुकीच्या बाबतीत राज्यातील उद्योगांना सर्वतोपरी सहकार्य करण्यास महामंडळ वचनबद्ध आहे.
उद्योगांसाठी आवश्यक विविध मंजूरी, परवानगी, परवाना आणि नूतनीकरणासाठी अर्ज करा. उपलब्ध सेवा येथे शोधा.
जिल्हे
शहरे
निर्देशिका
शासकीय विभाग
महामंडळे
महाराष्ट्रातील वास्तव्य
आरोग्य सेवा
ज्येष्ठ नागरिक
युवा आणि महिला सक्षमीकरण
रोजगार संधी
परिचय
शाळा
महाविद्यालये आणि विद्यापीठे
व्यावसायिक अभ्यासक्रम
सेवा 
मूलभूत घटक
योजना
नाविन्याची कास
पुरक उद्योग
उद्योगाची पायाभरणी
भरभराट
समापन
समुद्रकिनारे
सरोवराकाठी
थंड हवेची ठिकाणे
वारसा स्थळे