राज्यात युवा आणि महिला वर्गासाठी विकासाच्या अनेक उपयुक्त संधी उपलब्ध आहेत. शालेय शिक्षणाबरोबरच इच्छुकांना व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या अनेक नामांकित संस्था राज्यात कार्यरत आहेत. राज्य सरकारनेही इच्छुकांना रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.
महास्वयम कर्मचारी नियोक्ता मंच
तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? किंवा नियोक्ता आहात का? इच्छुक उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि नियोक्त्यांना योग्य उमेदवार उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने महास्वयमच्या माध्यमातून इच्छुक उमेदवार आणि नियोक्त्यांसाठी एक सामाईक मंच प्रदान केला आहे.
नाविन्यपूर्ण कल्पनांवर आधारित उद्योगांना राज्य शासन प्रोत्साहन देते. महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्या माध्यमातून अशा विविध प्रोत्साहनपर उपक्रमांबाबत जाणून घ्या आणि या उपक्रमांचा लाभ घ्या.
तुम्ही नवउद्योजक आहात का? पत हमी योजना, पत संलग्न भांडवल अनुदान योजना आणि अशा इतर उपयुक्त सरकारी योजनांच्या लाभांबाबत तुम्हाला अधिक जाणून घ्यायचे आहे का? अधिक माहितीसाठी या व्यासपीठावर नोंदणी करा. महाराष्ट्रात या उपक्रमाची दोन कार्यालये आहेत.
तुम्ही नवउद्योजक आहात का आणि तुम्हाला मदतीचा हात हवा आहे का? या मंचाच्या माध्यमातून नवउद्योजकांना आवश्यक सहाय्य प्रदान केले जाते. या उद्योजकांच्या उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी एमएसएमई विकास संस्था, मुंबई कार्यरत आहे.
सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसाठी केंद्र सरकार आणि इतर प्रोत्साहक संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या संधींबद्दल जाणून घेऊ इच्छिता का? त्यासाठी तुम्ही नागपूर येथील एमएसएमई विकास आणि सुविधा कार्यालयाला ऑनलाइन भेट देऊ शकता. या कार्यालयामार्फत नवोदित आणि वर्तमान उद्योजकांना त्यांचे उद्योग टिकवून ठेवण्यासाठी आणि वाढविण्यासाठी मदत केली जाते.
व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय
व्यावसायिक अभ्यासक्रमांबाबत जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक आहात का? राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांमधून विविध व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाते. सहा महिन्यांपासून दोन वर्षे मुदतीचे १३० पेक्षा जास्त अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. इयत्ता आठवी ते बारावी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेता येईल.
तुम्ही महिला उद्योजक आहात का? तुमच्या स्टार्टअपचे रूपांतर शाश्वत व्यवसायात करण्यास इच्छुक आहात? या आर्थिक सक्षमीकरण कार्यक्रमात तुमचे स्वागत आहे. महिलांच्या उद्योजकीय आणि व्यवस्थापकीय कौशल्यांमध्ये वाढ करण्यासाठी त्यांना उपयुक्त कौशल्ये आणि प्रशिक्षण प्रदान करण्यासाठी या कार्यक्रमाची रचना करण्यात आली आहे.
महिला उद्योजकता कक्ष सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील संस्थांच्या सहकार्याने काम करतो. हा मंच, विद्यमान महिला-केंद्रित उद्योजकता योजना, उपक्रम आणि कार्यक्रमांसाठी एक सामाईक व्यासपीठ प्रदान करतो. उद्योग करण्यासाठीच्या उत्तम पद्धतींची देवाण घेवाण करण्याबरोबरच महिला उद्योजकांसाठी उपयुक्त धोरण तयार करण्यास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने या मंचाचे कार्य उपयुक्त आहे.
माविम अशा संक्षिप्त नावाने सुपरिचित असणारे महिला आर्थिक विकास महामंडळ, महिला सक्षमीकरणासाठी विविध कार्यक्रम राबवते. ग्रामीण आणि शहरी भागातील उपेक्षित महिलांना स्वयं-सहायता गटांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्याद्वारे महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय सक्षमीकरणाला हातभार लावणे, हे महिला आर्थिक विकास महामंडळाचे उद्दिष्ट आहे.
महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महा-राज्य कामगार विमा सोसायटी कार्यालय, मुंबई येथे व त्यांचे अंतर्गत सेवा दवाखाना, महात्मा गांधी स्मारक रुग्णालय, परेल, विलेपार्ले, चारकोप कांदिवली येथे वैद्यकीय अधिकारी, गट-अ...
+अधिक
कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठीची विभागीय परीक्षा-2022 ची...
+अधिक
सहायक कक्ष अधिकारी सेवाप्रवेशोत्तर परीक्षा-2022 च्या...
+अधिक
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची ५ वाहने विक्री...
+अधिक
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील कालबाह्य उपकरणांची विक्री करणेबाबतची...
+अधिक
राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय, मुंबई यांच्यासाठी 1 लेझर मल्टी फंक्शन ऑटो डूप्लेस्क कलर प्रिंटर खरेदी करण्याकरीता दरपत्रक...
+अधिक
सनदी लेखापाल/कर सल्लागार यांची नेमणूक करणेबाबत दरपत्रके...
+अधिक
किरकोळ साधन सामुग्री, लेखनसामुग्री व उपयोग भांडार वस्तू खरेदीसाठी पुरवठादाराची नियुक्ती...
+अधिक
विधि व न्याय विभागातील निर्लेखित वाहन क्र. एम एच ०१ ए एन ७९७९ होंडा सिटी ची लिलावाने विक्री करण्याबाबत...
+अधिक
अन्न व औषध प्रशासनातील अन्न सुरक्षा अधिकारी ( गट-ब ) ( राजपत्रित ) हे पद राज्य शासनाच्या सेवेतील अधिका-यांमधुन प्रतिनियुक्तीने भरण्याबाबतचा...
+अधिक
आधार, ग्राहक तक्रार निवारण, निवृत्ती वेतन, शालार्थ आणि बिंदुनामावलीसाठी नागरिक सुविधा केंद्राचा संपर्क क्रमांक 18001208040
हा दुवा बाह्य संकेतस्थळावर नेणारा आहे. त्या बाह्य संकेतस्थळावरील माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाचे हे पोर्टल जबाबदार नाही, हे कृपया लक्षात असू द्या.