२०२०-२१ या शैक्षणिक वर्षात शालेय शिक्षण निर्देशांकात महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी राहिला आहे. (येथे क्लिक करा, पृष्ठ १५) भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या चौथ्या कामगिरी प्रतवारी निर्देशांकानुसार महाराष्ट्राला एकूण ९२८/१००० गुण मिळाले आहेत. या गुणांसह राज्याने गेल्या वर्षीच्या आठव्या क्रमांकावरून अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. शालेय शिक्षण संबंधी सकारात्मक परिवर्तनाचे मोजमाप करणाऱ्या या निर्देशांकानुसार केरळ आणि पंजाबसह महाराष्ट्र पहिल्या स्थानी विराजमान झाला आहे.
राज्यातील शिक्षण हक्क कायद्यांतर्गत ६ ते १४ वयोगटातील मुलांसाठी सरकारी तसेच सरकारी अनुदानित शाळांमध्ये प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे आहे.राज्यात प्राथमिक शिक्षण हा संपूर्ण औपचारिक शिक्षण प्रक्रियेचा पाया मानला जातो. वयाच्या सहाव्या वर्षापूर्वीच्या शिक्षणाला पूर्व प्राथमिक शिक्षण म्हणतात. पूर्व-प्राथमिक शिक्षण दोन वर्षांचे असते आणि त्याला लहान शिशुवर्ग आणि मोठा शिशुवर्ग म्हटले जाते. इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या शिक्षणाला प्राथमिक शिक्षण, इयत्ता सहावी ते आठवीला उच्च प्राथमिक शिक्षण तर इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या शिक्षणाला माध्यमिक शिक्षण म्हणतात. राज्यातील शालेय शिक्षण देणार्या विविध मंडळांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा.
राज्याच्या विविध भागांमधील शाळा तसेच राज्य सरकारतर्फे प्रदान केल्या जाणाऱ्या शालेय शिक्षणाशी संबंधित विविध सेवा आणि शालेय प्रमाणपत्रांच्या ऑनलाइन पडताळणीसाठीच्या वेब पोर्टलबद्दल अधिक जाणून घ्या.
महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महा-राज्य कामगार विमा सोसायटी कार्यालय, मुंबई येथे व त्यांचे अंतर्गत सेवा दवाखाना, महात्मा गांधी स्मारक रुग्णालय, परेल, विलेपार्ले, चारकोप कांदिवली येथे वैद्यकीय अधिकारी, गट-अ...
+अधिक
कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठीची विभागीय परीक्षा-2022 ची...
+अधिक
सहायक कक्ष अधिकारी सेवाप्रवेशोत्तर परीक्षा-2022 च्या...
+अधिक
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची ५ वाहने विक्री...
+अधिक
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील कालबाह्य उपकरणांची विक्री करणेबाबतची...
+अधिक
राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय, मुंबई यांच्यासाठी 1 लेझर मल्टी फंक्शन ऑटो डूप्लेस्क कलर प्रिंटर खरेदी करण्याकरीता दरपत्रक...
+अधिक
सनदी लेखापाल/कर सल्लागार यांची नेमणूक करणेबाबत दरपत्रके...
+अधिक
किरकोळ साधन सामुग्री, लेखनसामुग्री व उपयोग भांडार वस्तू खरेदीसाठी पुरवठादाराची नियुक्ती...
+अधिक
विधि व न्याय विभागातील निर्लेखित वाहन क्र. एम एच ०१ ए एन ७९७९ होंडा सिटी ची लिलावाने विक्री करण्याबाबत...
+अधिक
अन्न व औषध प्रशासनातील अन्न सुरक्षा अधिकारी ( गट-ब ) ( राजपत्रित ) हे पद राज्य शासनाच्या सेवेतील अधिका-यांमधुन प्रतिनियुक्तीने भरण्याबाबतचा...
+अधिक
आधार, ग्राहक तक्रार निवारण, निवृत्ती वेतन, शालार्थ आणि बिंदुनामावलीसाठी नागरिक सुविधा केंद्राचा संपर्क क्रमांक 18001208040
हा दुवा बाह्य संकेतस्थळावर नेणारा आहे. त्या बाह्य संकेतस्थळावरील माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाचे हे पोर्टल जबाबदार नाही, हे कृपया लक्षात असू द्या.