महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री

हे पेज शेअर करा:
Deputy Chief Minister of Maharashtra

देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री

श्री. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. २०१४ ते २०१९ या काळात त्यांनी महाराष्ट्राचे अठरावे मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. महाराष्ट्र हे क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या बाबतीत भारतातील तिसरे सर्वात मोठे राज्य असून, देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली राज्याने औद्योगिक उत्पादनाच्या क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेत, आर्थिकदृष्ट्या प्रगत राज्य अशी ओळख निर्माण केली.

आपल्या अभ्यासू आणि व्यासंगी स्वभावाला अनुसरून त्यांनी कायद्यातील पदवी, उद्योग व्यवस्थापन या विषयात पदव्युत्तर पदवी आणि बर्लिनमधल्या डीएसई संस्थेमधून प्रकल्प व्यवस्थापन या विषयात पदविका प्राप्त केली आहे. १९९२ साली फारच कमी वयात त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात तरुण महापौर होण्याचा मान त्यांनी पटकावला. ते नागपूरचे सर्वात तरुण महापौर आहेत आणि ‘मेयर इन कौन्सिल’ या पदावर पुन्हा निवडून आलेले एकमेव व्यक्ती आहेत. सलग ५ वेळा ते महाराष्ट्र विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले आहेत. जनतेचा नेता असा लौकीक त्यांनी कमावला आहे.

राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनांमध्ये सदनातील उत्साही आणि अभ्यासू सदस्य म्हणून त्यांचा वावर जाणवत राहतो. कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनचा सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला आहे. जपानच्या ओसाका सिटी युनिव्हर्सिटीने त्यांना मानद डॉक्टरेट बहाल केली आहे. 120 वर्षे जुन्या अशा या विद्यापीठाने आतापर्यंत जगातील केवळ दहा प्रतिष्ठित व्यक्तींना ही सर्वोच्च मानद पदवी प्रदान केली आहे आणि महाराष्ट्राच्या सामाजिक-आर्थिक विकासात मोलाचे योगदान देणारे देवेंद्र फडणवीस, हा सन्मान मिळवणारे पहिले भारतीय आहेत.

ताज्या घडामोडी :

  • xcv... +अधिक
  • ई-निविदा सूचना (वर्ष... +अधिक
  • महाजिओटेक महामंडळ  (MahaGeo Tech Corporation) च्या तांत्रिक व कार्यालयीन कामकाजाकरिता 1 सेवानिवृत्त कक्ष अधिकारी  व 1 सेवानिवृत्त सहायक कक्ष अधिकारी यांची करार पध्दतीने नियुक्ती... +अधिक
  • महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महा-राज्य कामगार विमा सोसायटी कार्यालय, मुंबई येथे व त्यांचे अंतर्गत सेवा दवाखाना, महात्मा गांधी स्मारक रुग्णालय, परेल, विलेपार्ले, चारकोप कांदिवली येथे वैद्यकीय अधिकारी, गट-अ... +अधिक
  • कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठीची विभागीय परीक्षा-2022 ची... +अधिक
  • सहायक कक्ष अधिकारी सेवाप्रवेशोत्तर परीक्षा-2022 च्या... +अधिक
  • महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची ५ वाहने विक्री... +अधिक
  • महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील कालबाह्य उपकरणांची विक्री करणेबाबतची... +अधिक
  • राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय, मुंबई यांच्यासाठी 1 लेझर मल्टी फंक्शन ऑटो डूप्लेस्क कलर प्रिंटर खरेदी करण्याकरीता दरपत्रक... +अधिक
  • सनदी लेखापाल/कर सल्लागार यांची नेमणूक करणेबाबत दरपत्रके... +अधिक
  • वाहनाच्या सुट्टे भागांच्या खरेदीबाबत चे... +अधिक
  • किरकोळ साधन सामुग्री, लेखनसामुग्री व उपयोग भांडार वस्तू खरेदीसाठी पुरवठादाराची नियुक्ती... +अधिक
  • विधि व न्याय विभागातील निर्लेखित वाहन क्र. एम एच ०१ ए एन ७९७९ होंडा सिटी ची लिलावाने विक्री करण्याबाबत... +अधिक
  • अन्न व औषध प्रशासनातील अन्न सुरक्षा अधिकारी ( गट-ब ) ( राजपत्रित ) हे पद राज्य शासनाच्या सेवेतील अधिका-यांमधुन प्रतिनियुक्तीने भरण्याबाबतचा... +अधिक

आधार, ग्राहक तक्रार निवारण, निवृत्ती वेतन, शालार्थ आणि बिंदुनामावलीसाठी नागरिक सुविधा केंद्राचा संपर्क क्रमांक 18001208040https://maharashtra.mygov.in/ मंत्रालयाचा मुख्य दूरध्वनी क्रमांक :०२२-२२०२४२४३