आपत्कालीन परिस्थितीत या नि:शुल्क क्रमांकावरून पोलीस आणि अग्निशमन दलाशी त्वरीत संपर्क साधता येईल. संकटात सापडलेल्या महिलांसाठी तसेच वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत सहाय्यासाठी या क्रमांकावर तातडीची सेवा उपलब्ध आहे.
वैशिष्ट्ये
२४ तास प्रभावी आपत्कालीन प्रतिसाद सेवा
व्हॉईस कॉल, एसओएस, एसएमएस, ईमेल, वेब विनंती किंवा पॅनिक बटणाचा वापर करून मदतीसाठी विनंती करा
कॉलर/पीडित व्यक्ती जिथे असेल, त्या ठिकाणाचा स्वयंचलित मागोवा
नजीकच्या आपत्कालीन प्रतिसाद वाहनातून तातडीने सहाय्य उपलब्ध
आपत्कालीन प्रतिसाद वाहनांचा थेट मागोवा
मध्यवर्ती नियंत्रण केंद्राद्वारे आपत्कालीन सेवा समन्वय
आपत्कालीन परिस्थितीत झटपट निर्णय, परिणामी कमी वेळात प्रतिसाद शक्य
या नि:शुल्क क्रमांकावर फोन करून, अत्यवस्थ रूग्णांना पुढच्या उपचारांसाठी जवळच्या रूग्णालयांमध्ये दाखल करण्यासाठी, जीवन रक्षक रूग्णवाहिका मागवता येते. रस्ते अपघात, सर्व प्रकारचे गंभीर आजार, गंभीर परिस्थिती असणाऱ्या गर्भवती महिला, नवजात बालके, साथीच्या रोगाचे अत्यवस्थ रूग्ण अशा सर्वांसाठी तसेच नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित धोक्यांमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत सहाय्यासाठी ही सेवा उपलब्ध आहे.
वैशिष्ट्ये
“गोल्डन अवर थिअरी” – आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यापासूनच्या पहिल्या तासात रुग्णाला जवळच्या रुग्णालयात हलवले जाईल
रुग्णासाठी २४ तास नि:शुल्क सेवा उपलब्ध
अद्ययावत जीवन रक्षक सहाय्य रुग्णवाहिका आणि मूलभूत जीवन रक्षक सहाय्य रुग्णवाहिका उपलब्ध
प्रशिक्षित वाहनचालक आणि स्वत: डॉक्टर असणाऱ्या प्रशिक्षित आपत्कालीन वैद्यकीय सेवा अधिकाऱ्यांनी सुसज्ज रूग्णवाहिका
वाहनात संगणक तंत्रज्ञान, व्हॉईस लॉगर यंत्रणा, भौगोलिक माहिती यंत्रणा, भौगोलिक स्थिती यंत्रणा, स्वयंचलित वाहन मागोवा यंत्रणा आणि मोबाइल कम्युनिकेशन यंत्रणा उपलब्ध
भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य असणाऱ्या महाराष्ट्रातील पोलीस दल कार्यक्षम आणि कर्तव्यदक्ष आहे. पोलिस महासंचालक हे महाराष्ट्र पोलिसांचे प्रमुख आहेत. पोलीस दलाचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे. राज्यात 36 जिल्हा पोलिस एकके आणि 10 आयुक्तालये आहेत.
महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महा-राज्य कामगार विमा सोसायटी कार्यालय, मुंबई येथे व त्यांचे अंतर्गत सेवा दवाखाना, महात्मा गांधी स्मारक रुग्णालय, परेल, विलेपार्ले, चारकोप कांदिवली येथे वैद्यकीय अधिकारी, गट-अ...
+अधिक
कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठीची विभागीय परीक्षा-2022 ची...
+अधिक
सहायक कक्ष अधिकारी सेवाप्रवेशोत्तर परीक्षा-2022 च्या...
+अधिक
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची ५ वाहने विक्री...
+अधिक
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील कालबाह्य उपकरणांची विक्री करणेबाबतची...
+अधिक
राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय, मुंबई यांच्यासाठी 1 लेझर मल्टी फंक्शन ऑटो डूप्लेस्क कलर प्रिंटर खरेदी करण्याकरीता दरपत्रक...
+अधिक
सनदी लेखापाल/कर सल्लागार यांची नेमणूक करणेबाबत दरपत्रके...
+अधिक
किरकोळ साधन सामुग्री, लेखनसामुग्री व उपयोग भांडार वस्तू खरेदीसाठी पुरवठादाराची नियुक्ती...
+अधिक
विधि व न्याय विभागातील निर्लेखित वाहन क्र. एम एच ०१ ए एन ७९७९ होंडा सिटी ची लिलावाने विक्री करण्याबाबत...
+अधिक
अन्न व औषध प्रशासनातील अन्न सुरक्षा अधिकारी ( गट-ब ) ( राजपत्रित ) हे पद राज्य शासनाच्या सेवेतील अधिका-यांमधुन प्रतिनियुक्तीने भरण्याबाबतचा...
+अधिक
आधार, ग्राहक तक्रार निवारण, निवृत्ती वेतन, शालार्थ आणि बिंदुनामावलीसाठी नागरिक सुविधा केंद्राचा संपर्क क्रमांक 18001208040
हा दुवा बाह्य संकेतस्थळावर नेणारा आहे. त्या बाह्य संकेतस्थळावरील माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाचे हे पोर्टल जबाबदार नाही, हे कृपया लक्षात असू द्या.