आपत्कालीन सेवा
आपत्कालीन परिस्थितीत या नि:शुल्क क्रमांकावरून पोलीस आणि अग्निशमन दलाशी त्वरीत संपर्क साधता येईल. संकटात सापडलेल्या महिलांसाठी तसेच वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत सहाय्यासाठी या क्रमांकावर तातडीची सेवा उपलब्ध आहे.
वैशिष्ट्ये
- २४ तास प्रभावी आपत्कालीन प्रतिसाद सेवा
- व्हॉईस कॉल, एसओएस, एसएमएस, ईमेल, वेब विनंती किंवा पॅनिक बटणाचा वापर करून मदतीसाठी विनंती करा
- कॉलर/पीडित व्यक्ती जिथे असेल, त्या ठिकाणाचा स्वयंचलित मागोवा
- नजीकच्या आपत्कालीन प्रतिसाद वाहनातून तातडीने सहाय्य उपलब्ध
- आपत्कालीन प्रतिसाद वाहनांचा थेट मागोवा
- मध्यवर्ती नियंत्रण केंद्राद्वारे आपत्कालीन सेवा समन्वय
- आपत्कालीन परिस्थितीत झटपट निर्णय, परिणामी कमी वेळात प्रतिसाद शक्य
या नि:शुल्क क्रमांकावर फोन करून, अत्यवस्थ रूग्णांना पुढच्या उपचारांसाठी जवळच्या रूग्णालयांमध्ये दाखल करण्यासाठी, जीवन रक्षक रूग्णवाहिका मागवता येते. रस्ते अपघात, सर्व प्रकारचे गंभीर आजार, गंभीर परिस्थिती असणाऱ्या गर्भवती महिला, नवजात बालके, साथीच्या रोगाचे अत्यवस्थ रूग्ण अशा सर्वांसाठी तसेच नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित धोक्यांमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत सहाय्यासाठी ही सेवा उपलब्ध आहे.
वैशिष्ट्ये
- “गोल्डन अवर थिअरी” – आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यापासूनच्या पहिल्या तासात रुग्णाला जवळच्या रुग्णालयात हलवले जाईल
- रुग्णासाठी २४ तास नि:शुल्क सेवा उपलब्ध
- अद्ययावत जीवन रक्षक सहाय्य रुग्णवाहिका आणि मूलभूत जीवन रक्षक सहाय्य रुग्णवाहिका उपलब्ध
- प्रशिक्षित वाहनचालक आणि स्वत: डॉक्टर असणाऱ्या प्रशिक्षित आपत्कालीन वैद्यकीय सेवा अधिकाऱ्यांनी सुसज्ज रूग्णवाहिका
- वाहनात संगणक तंत्रज्ञान, व्हॉईस लॉगर यंत्रणा, भौगोलिक माहिती यंत्रणा, भौगोलिक स्थिती यंत्रणा, स्वयंचलित वाहन मागोवा यंत्रणा आणि मोबाइल कम्युनिकेशन यंत्रणा उपलब्ध
मुख्यमंत्री सहायता निधी
- मुख्यमंत्री सहायता निधीतर्फे महाराष्ट्र आणि देशभरातील आपत्कालीन गरजा पूर्ण करण्यासाठी तात्काळ आर्थिक मदत पुरवली जाते. हा निधी नैसर्गिक आपत्ती, जातीय दंगली, दहशतवादी हल्ले, अपघात आणि उपचार किंवा शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या गंभीर वैद्यकीय परिस्थितीमुळे बाधित झालेल्या व्यक्ती आणि कुटुंबांना आधार देतो. हा निधी गरजू संस्थांनाही साहाय्य करतो, शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास मदत करतो, त्याचबरोबर शैक्षणिक व वैद्यकीय सुविधांच्या बांधकामासाठी आंशिक साहाय्य पुरवतो.
- देणगीसाठी क्लिक करा
- देणगीची सद्यस्थिती पाहा
- छायाचित्रे आणि व्हिडिओ

सद्रक्षणाय खलनिग्रहणाय
भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य असणाऱ्या महाराष्ट्रातील पोलीस दल कार्यक्षम आणि कर्तव्यदक्ष आहे. पोलिस महासंचालक हे महाराष्ट्र पोलिसांचे प्रमुख आहेत. पोलीस दलाचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे. राज्यात 36 जिल्हा पोलिस एकके आणि 10 आयुक्तालये आहेत.

जिल्हे
शहरे
निर्देशिका
शासकीय विभाग
महामंडळे
महाराष्ट्रातील वास्तव्य
आरोग्य सेवा
ज्येष्ठ नागरिक
युवा आणि महिला सक्षमीकरण
रोजगार संधी
परिचय
शाळा
महाविद्यालये आणि विद्यापीठे
व्यावसायिक अभ्यासक्रम
सेवा 
मूलभूत घटक
योजना
नाविन्याची कास
पुरक उद्योग
उद्योगाची पायाभरणी
भरभराट
समापन
समुद्रकिनारे
सरोवराकाठी
थंड हवेची ठिकाणे
वारसा स्थळे