जगभरातील गुंतवणूकदारांचे महाराष्ट्रात मनापासून स्वागत
खेड शहर औद्योगिक क्षेत्र संकुल, पुणे
एप्रिल २००० ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत महाराष्ट्रात एकूण १०,८८,५०२ कोटी रूपये इतक्या विक्रमी थेट परकीय गुंतवणुकीची नोंद झाली. देशातील एकूण थेट परकीय गुंतवणुकीच्या तुलनेत हे प्रमाण २८.५ % इतके होते. तर जून २०२० ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 अंतर्गत महाराष्ट्रात ४.२७ लाख रोजगार संधींची क्षमता असणारे २.७४ लाख कोटी रूपये मूल्याचे गुंतवणूक प्रस्ताव प्राप्त झाले. (संदर्भ - आर्थिक सर्वेक्षण 2022-23). हे उद्दिष्ट गाठण्यासाठी कृषीपासून अंतराळ क्षेत्रापर्यंत विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूकदारांचे स्वागत करण्यास राज्य उत्सुक आहे. महाराष्ट्र इंडस्ट्री, ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटेशन सेल (MAITRI) च्या संकेतस्थळावर त्यासाठी आवश्यक सर्व तपशील उपलब्ध असून, गुंतवणूकदारांना सेवा प्रदान करण्यासाठी ही एकल खिडकी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तुम्ही महाराष्ट्रात गुंतवणूक करू इच्छित असाल तर या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या.
या संकेतस्थळावरून गुंतवणूकदारांना अधिकार्यांशी थेट संपर्क साधता येईल किंवा एक साधा अर्ज भरून गुंतवणूकीच्या संधीबाबतचे तपशील प्राप्त करता येतील. त्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन हवे असल्यास उद्योग संचालक यांच्याशी maitri-mh@gov.inया ईमेलवर किंवा +9122-22622362 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार या एकल खिडकी सुविधेचा लाभ घेऊ शकतात. सर्व मंजूरी मिळवू शकतात.
महाराष्ट्राला उद्योजकतेची समृद्ध परंपरा लाभली आहे. उद्योगांसाठी आवश्यक दर्जेदार आणि कुशल मनुष्यबळाबरोबरच वाहतूक संबंधी सर्वोत्तम पायाभूत सुविधा राज्यात उपलब्ध आहेत. द्रुतगती मार्गांबरोबरच रेल्वे, मेट्रोचे सक्षम जाळे राज्यात असून मुंबई, पुणे, नागपूर या शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळसुद्धा आहेत. ७२० किमी लांबीची प्रदीर्घ किनारपट्टी राज्याला लाभली असून ५५ बंदरांवरून माल वाहतुक केली जाते. विशेष म्हणजे भारतातील एकूण माल वाहतुकीपैकी २२% वाहतूक या बंदरांमार्फत केली जाते. सर्व इच्छुक गुंतवणूकदारांचे महाराष्ट्रात सहर्ष स्वागत आहे!
महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महा-राज्य कामगार विमा सोसायटी कार्यालय, मुंबई येथे व त्यांचे अंतर्गत सेवा दवाखाना, महात्मा गांधी स्मारक रुग्णालय, परेल, विलेपार्ले, चारकोप कांदिवली येथे वैद्यकीय अधिकारी, गट-अ...
+अधिक
कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठीची विभागीय परीक्षा-2022 ची...
+अधिक
सहायक कक्ष अधिकारी सेवाप्रवेशोत्तर परीक्षा-2022 च्या...
+अधिक
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची ५ वाहने विक्री...
+अधिक
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील कालबाह्य उपकरणांची विक्री करणेबाबतची...
+अधिक
राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय, मुंबई यांच्यासाठी 1 लेझर मल्टी फंक्शन ऑटो डूप्लेस्क कलर प्रिंटर खरेदी करण्याकरीता दरपत्रक...
+अधिक
सनदी लेखापाल/कर सल्लागार यांची नेमणूक करणेबाबत दरपत्रके...
+अधिक
किरकोळ साधन सामुग्री, लेखनसामुग्री व उपयोग भांडार वस्तू खरेदीसाठी पुरवठादाराची नियुक्ती...
+अधिक
विधि व न्याय विभागातील निर्लेखित वाहन क्र. एम एच ०१ ए एन ७९७९ होंडा सिटी ची लिलावाने विक्री करण्याबाबत...
+अधिक
अन्न व औषध प्रशासनातील अन्न सुरक्षा अधिकारी ( गट-ब ) ( राजपत्रित ) हे पद राज्य शासनाच्या सेवेतील अधिका-यांमधुन प्रतिनियुक्तीने भरण्याबाबतचा...
+अधिक
आधार, ग्राहक तक्रार निवारण, निवृत्ती वेतन, शालार्थ आणि बिंदुनामावलीसाठी नागरिक सुविधा केंद्राचा संपर्क क्रमांक 18001208040
हा दुवा बाह्य संकेतस्थळावर नेणारा आहे. त्या बाह्य संकेतस्थळावरील माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाचे हे पोर्टल जबाबदार नाही, हे कृपया लक्षात असू द्या.